शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यासाठी रांजणी येथील जागेचा ‘ड्रायपोर्ट’साठी प्रस्ताव- : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:01 IST

सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

ठळक मुद्देस्पाईस पार्क, सौरऊर्जा प्रकल्पही उभारणारया प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूकसांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यातील

सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव दिला असून, केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ व प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

खा. पाटील म्हणाले की, हे एक कोरडे बंदर असणार आहे. फुले, द्राक्षे, डाळिंब, दूध अशा शेती व शेतीपूरक उद्योगातील उत्पादनांना ते उपयोगी ठरणार आहे. येथून थेट निर्यात करण्यासाठी याठिकाणी संबंधित सर्व शासकीय कार्यालयेही थाटली जाणार आहेत. या पोर्टचा फायदा सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यातील शेतकºयांनाही होणार आहे. परदेशातून प्रक्रियेसाठी येणाºया कच्च्या मालासाठीही हे बंदर उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उद्योगाच्या वाढीस चालना मिळेल.

बंदर झाल्यानंतर याठिकाणी रस्ते, वीज, शीतगृहे, गोदामे यासारख्या सुविधांचा लाभही जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे हा निर्णय जिल्ह्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.याचठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून निर्माण होणाºया विजेमुळे सिंचन योजनांसमोरील विजेचा प्रश्न निकालात निघेल. अनेकदा सिंचन योजना वीजबिलाअभावी बंद पडतात. सौरऊर्जा प्रकल्पसुद्धा आमच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.

स्पाईस पार्क उभारण्याचेही प्रयत्न आहेत. लोणचे व चटण्यांची मोठी बाजारपेठ या माध्यमातून तयार होईल. जिल्ह्यातील अशा उद्योगाला निर्यातीचे दरवाजे खुले होतील, असेही ते म्हणाले. यावेळी मकरंद देशपांडे उपस्थित होते.'जागेची उपलब्धता मोठीशासनाच्याच मालकीची रांजणी येथील २ हजार २00 एकर जागा उपलब्ध आहे. याच जागेचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे दिला आहे. प्रकल्पासाठी २ हजार एकर जागा लागेल. या जागेच्या बाजूनेच विजापूर-गुहागर हा राष्टÑीय महामार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे आपोआप रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागेल. या प्रकल्पाचा विकास आराखडा येत्या आठवड्याभरात निश्चित होणार आहे, असे खा. पाटील म्हणाले.‘टेंभू’साठी ५५0 कोटींची मागणीताकारी व म्हैसाळ योजनेसाठी यापूर्वीच पंतप्रधान सिंचन योजनेतून निधीची तरतूद झाली आहे. टेंभूसाठी आणखी ५५0 कोटी रुपयांची मागणी आम्ही केली आहे. नोव्हेंबर २0१९ पर्यंत सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.